नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील रामरहिम नगरात द्वेषबुद्धीने ज्वलनशील पदार्थ टाकून दोन दुचाकी जाळून नुकसान केल्याप्रकरणी दोघा अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील रामरहिम नगरातील वसीम सरवर पिंजारी यांच्या मालकीच्या दोन दुचाकी घरासमोरील अंगणात उभ्या केलेल्या होत्या. दोन अनोळखी इसमांनी द्वेषबुद्धीने काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून दोन्ही दुचाकी जाळून नुकसान केले.
याबाबत वसीम पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात इसमांविरुद्ध भादंवि कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आराक करीत आहेत.








