Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे अंगणवाडी सेविकांचे प्रभावी पोषण शिक्षणावर प्रशिक्षण उत्साहात

team by team
July 27, 2022
in राज्य
0
धडगाव येथे अंगणवाडी सेविकांचे प्रभावी पोषण शिक्षणावर प्रशिक्षण उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

एकात्मिक बालविकास योजना आणि डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात 21 ते 23 जुलै,2022 या कालावधीत तीन दिवशीय अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकाचे प्रभावी पोषण शिक्षण संदर्भात प्रशिक्षण संपन्न झाले.

 

या प्रशिक्षणाला जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी कृष्णा राठोड, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्थेचे संतोष मोरे, प्रशिक्षण प्रमुख विनोद आडोकर, सीमा पाडवी, संदीप काकड, सपना पानपाटील, संदीप राजपूत, प्रीतेश पाटील, यमुना पावरा उपस्थित होते.

 

या प्रशिक्षण शिबीराची सुरुवात 19 जुलै रोजी डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथून जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी कृष्णा राठोड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली होती.

 

 

शिबिरात दुर्बल घटकातील 15 ते 49 वयोगटातील किशोरवयीन मुली, प्रजननक्षम गर्भवती व स्तनदामाता तसेच 6 ते 23 महीने वयोगटातील बालके त्यांचा पोषणआहार मध्ये व आरोग्यस्थितीत सुधारणा बरोबर पोषण परसबाग निर्मिती व त्याचे महत्व पटवून सांगणे इत्यादीबाबत प्रशिक्षणात माहिती देण्यात आली.

 

 

तसेच एनपीएलए पोषण शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या वीस बैठकापैकी पहिल्या सात बैठकाशी निगडीत उद्देशांना अनुरूप प्रशिक्षण दरम्यान दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी विविध खेळाच्या माध्यमातून जसे की एकीचे बळ, पवलांचा खेळ, गाव नकाशा, सुपोषित सेतु, गीत, गायन, समस्या चित्रण, नाटके संकल्पित सुपोषित गाव आदी माध्यमातून क्षमता बांधणी करून त्यांची माहिती देण्यात आली.

 

 

यावेळी अंगणवाडी सेविकाद्वारे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेण्यात आले आणि गाव पातळीवर या सात बैठकांचे कसे नियोजन करावे याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणात अंगणवाडी सेविकाची पूर्व व अंतिम आकलन चाचणी घेऊन प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणात 83 अंगणवाडी सेविका व 23 अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवण नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावे

Next Post
मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावे

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add