Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.ॲड.के.सी.पाडवी पिंपळखुंटा परिसरात भेट देऊन रस्त्यांची केली पाहणी

team by team
July 27, 2022
in राजकीय
0
आ.ॲड.के.सी.पाडवी पिंपळखुंटा परिसरात भेट देऊन रस्त्यांची केली पाहणी

नंदूरबार l प्रतिनिधी

गेल्या पंधरवाड्यात अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने ठिक ठिकाणी रस्त्यांची अत्यंत दूरावस्था झाली आहे.त्यामुळे माजी मंत्री तथा अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.के.सी.पाडवी यांनी जांगठी,वडफळी पिंपळखुंटा परिसरात भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली.

दि.11 व 12 जुलै व त्यानंतर अक्कलकुवा तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले दि.11 व 12 रोजी वडफळी व मोलगी परिसरात एकाच दिवसात सुमारे 600 मिमी पर्यंत पावसाची नोंद झाली.अतिवृष्टीमुळे मोलगी ते पिंपळखुंटा ते वडफळी रस्ता तसेच पिंपळखुंटा जांगठी रस्त्यावर ठिक ठिकाणी दरड कोसळुन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली.

 

मोठं मोठ्या दगडांचे मलबे पडुन संपुर्ण रस्ताच बंद झाला त्यामुळे नर्मदा परिसरातील नागरिकांना दळणवळणा साठी अतोनात त्रास सहन करावा लागत होता त्या पार्श्वभूमीवर आमदार के.सी.पाडवी यांनी परिसरात भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली.सोबतच ज्या ज्या ठिकाणी आ.पाडवी यांनी रस्त्याची पाहणी केली त्या त्या ठिकाणाहुन त्यांनी मातीचे नमुने घेतले.

 

दरवर्षी अतिवृष्टीमुळे परिसरात दरड कोसळतात त्यामुळे रस्ते साफ करतांना व त्या ठिकाणी मदत पोहचवतांना प्रशासनाला देखील मोठ्या तारेवरची कसरत करावी लागते.यावेळी रस्त्याची पाहणी करतांना आ.पाडवी यांनी काही निरीक्षणे नोंदवून कायम स्वरुपी त्यावर काय उपाय योजना आखता येतील याबाबत मार्गदर्शन केले.

 

तसेच जांगठी विशेषतः नर्मदा काठाकडील रस्त्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांची तातडीने दुरुस्ती करण्या संदर्भात आदेशीत केले.यावेळी आ.पाडवी यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला बाल कल्याण सभापती निर्मला राऊत, सीताराम राऊत, हारसिंग पावरा उपस्थित होते.

 

 

दरवर्षी अतिवृष्टीमुळे सातपुड्यातील रस्त्यांवर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात येणारे रस्ते हे प्रसंगी कुचकामी ठरत असतात.यापुढे रस्ते तयार करतांना येथील डोंगर दऱ्यातील मातीचा प्रामुख्याने अभ्यास करणे गरजेचे झाले आहे.तसेच कायमस्वरूपी रस्त्यांवर दरड कोसळू नयेत यासाठी पहाड पट्ट्यावर विशिष्ट गवत लावणे या सारख्या काय उपाय योजना योजता येतील याबाबत वरिष्ठ पातळीवर आपण चर्चा करणार आहोत तसेच रस्त्यांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी मार्ग काढण्यात येईल.

ॲड..के.सी.पाडवी
आमदार,अक्कलकुवा- धडगाव

बातमी शेअर करा
Previous Post

वस्तीशाळा शिक्षक नियमित वेतनश्रेणी पासून वंचित, धडगाव येथे शिक्षक संपर्क मेळाव्यात शिक्षक परिषदेकडे भावनिक साद

Next Post

श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

Next Post
श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add