तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालय रांझणी येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एल.अॅण्ड टी.कंपनी सुरत येथील एस.ई.ओ.श्री.हिमांशुजी निमानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी एल.अॅण्ड टी.कंपनी सुरत येथील एस.ई.ओ. श्री.हिमांशुजी निमानी, संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार जैन, संचालक कुुमारपाल जैन, योगिता निमानी, मोहनचंद निमानी, मनोज निमानी, कांचन निमानी, संगिता निमानी आदी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सूत्रसंचालन दिपक मराठे यांनी केले.
तसेच एल.अँड टी.कंपनी सुरत येथील एस.ई.ओ.श्री.हिमांशुजी निमानी, संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार जैन, संचालक कुुमारपाल जैन यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रविण वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे, भरत ठाकरे यांनी परिश्रम घेतले. तर आभार प्रदर्शन प्राचार्य प्रविण वसावे यांनी मानले.