नंदुरबार | प्रतिनिधी
भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन कृषि तंत्र विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कृषि तंत्र विद्यालय, उमर्दे रोड ( होळ शिवार ) ता . जि . नंदुरबार येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उमर्दे खुर्दे येथील सरपंच अरविद भिका ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी ७ वा ४५ मि .करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार शिवसेना तालुकाउपाध्यक्ष सागर रमेश साळुखे हे होते. यावेळी प्राचार्य के. जी. मराठे, समाजसेवक गुलाब महारू मराठे व रविंद्र वामन साळवे उपस्थित होते . विद्यालयाचे प्राचार्य के.जी.मराठे यांनी उपस्थीत मान्यवरांचा सत्कार केला .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.जयप्रकाश बाविस्कर व प्रकल्प संचालक विजय ठाकरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती.तिराले, प्रा.बच्छाव,वंश रघुवंशी व महेंद्रसिंग चितोडीया यांनी परिश्रम घेतले . तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . योगेश पाटील यांनी केले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सुचनांचे यावेळी तंतोतंत पालन करण्यात आले.