नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
बुधवार 18 ऑगस्ट 2021 रोजी सायं. 6.30 वा. आष्टे ता. नंदुरबार येथे आगमन व स्वागत. सायं. 7 वा. आष्टे येथून नंदुरबारकडे प्रयाण, सायं. 7 वा. नंदुरबार येथे आगमन व नंदुरबार प्रवेशद्वार येथे स्वागत. 7.10 वा. साक्री नाका येथे आगमन व आदिवासी समाजातर्फे स्वागत व सांस्कृतिक कार्यक्रम, 7.15 वा. गोंधळी समाजातर्फे स्वागत सत्कार. 7.20 वा. साक्री नाका येथे गवळी समाजातर्फे स्वागत. 7.25 वा. साक्री नाका येथे अल्पसंख्याक समाजातर्फे सत्कार. 7.30 वा. साईबाबा मंदीर येथे दर्शन. 7.35 वाजता गणपती रोड येथे सोनार समाजातर्फे स्वाग. 7.40 वा. जळका बाजार रोड येथे तेली समाजातर्फे सत्कार. 7.50 वा. गणपती मंदीर रोड येथे बोहरी समाजातर्फे स्वागत. 7.55 वा. गणपती मंदीर रोड येथे मारवाडी समाजातर्फे स्वागत. रात्री 8.05 वा. गणपती रोड येथे बागवान समाजातर्फे स्वागत. 8.10 वा. गणपती मंदीर रोड येथे माळी समाजातर्फे स्वागत. 8.15 वाजता गणपती मंदीर दर्शन. 8.20 वा. तांबोळी समाजातर्फे सत्कार. 8.25 ब्राम्हण समाजातर्फे स्वागत. 8.30 वा. मराठा युवा मंच यांचेतर्फे सत्कार. 8.40 वा. जैन युवा मंचातर्फे स्वागत. 8.45 वा. हाटदरवाजा व्यापारी संघटनेकडून स्वागत. 8.50 वा. गिरीविहारगेट हाटदरवाजा येथे गुजर पाटीदार युवा मंच तर्फे सत्कार. रात्री 9 वा. सिंधीकॉलनी येथे सिंधी समाजातर्फे सत्कार. पेट्रोलपंप शिक्षण परिषद यांच्यातर्फे सत्कार व पेट्रोलपंप चौक वंजारी समाज यांच्यातर्फे स्वागत. 9.10 वा. पेट्रोलपंप चौक भटक्या विमुक्त परिषद यांच्यातर्फे स्वागत. 9.20 वा. साईपॅलेस चौक येथे राणा राजपूत समाज यांच्यातर्फे स्वागत. 9.25 वा. विजयपर्व येथे मराठा समाज यांच्यातर्फे सत्कार रात्री 9.30 वा. जिल्हाअध्यक्ष यांच्या घरी भेट व मुक्काम.
गुरुवार 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे कोविड सेंटरला भेट. 9.30 वा. जेपीएन रुग्णालय नंदुरबार येथे कोविड लसीकरण सेंटरला भेट. 10 वा. गुरुनानक मंगल कार्यालय नंदुरबार येथे आयुष्यमान भारत योजना लाभार्थ्यांतर्फे सत्कार. 11 वा. भारतीय जनता पार्टी यांचे मुख्यालय येथे पत्रकार परिषद. दुपारी 12 वा. महत्वाच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी 1 वाजता विजयपर्व येथे राखीव. दुपारी 2 वा. सैनिक स्कुल पथराई येथे कोकणी समाज यांच्यातर्फे सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. तळोदा शहर पार्टी कार्यकर्ता यांच्यातर्फे स्वागत. 2.40 वा. तळोदा येथे विविध समाजाच्या लोकांकडून सत्कार. 2.45 वा. तळोदा येथे आदिवासी भवन येथे महिला मेळाव्यास उपस्थिती. सायं. 5 वाजता रंजनपूर संत गुलामबाबा समाधीस्थळ येथे दर्शन. 7 वा. सोमावल येथे कार्यकर्त्यांसमवेत बैठक व चर्चा. रात्री 8 वा. आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी मुक्काम.
शक्रवार 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता तळोदा येथून अक्कलकुवाकडे प्रयाण. 9.30 वा. अक्कलकुवा येथे आगमन व स्वागत. 9.40 वा. अक्कलकुवा येथून खापरकडे प्रयाण. 9.50 वा. खापर येथे आगमन व स्वागत. सकाळी 10 वाजता देवमोगरा माता मंदीर दर्शन. 11.30 वा. देवमोगरा माता मंदीर खापर येथून दोंडाईचाकडे प्रयाण.