नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरात अतिक्रमण व फॅन्सी-विना नंबर प्लेट वाहनांवर पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली.
शहादा शहरात नागरिकांना रहदारीसाठी अडचण ठरणाऱ्या अतिक्रमण धारकांवर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश सिनारे व शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
यावेळी अवैधरित्या असलेले अतिक्रमण काढण्यात आले. दरम्यान शहादा पोलिसांच्या वतीने शहरात फॅन्सी नंबर प्लेट व विना नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई सुरू केली आहे.
यावेळी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्यासह पथक उपस्थित होते. शहरात नागरिकांना अतिक्रमणामुळे अडचण निर्माण होऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी कारवाई केली जात असल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
शहादा शहरात अतिक्रमण धारकांनी सपाटा लावला असून अनेक नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने सदर कारवाई सुरू केली आहे.








