नंदूरबार | प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खु. येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाली.
उमर्दे खु. ता. नंदूरबार येथे भव्य विठ्ठल रुक्माई मंदिर उभारण्यात आले आहे. विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त जय्यत तयारी करण्यात आली होते.
दि.१० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल-रुखमाईच्या दर्शनासाठी येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला होता.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेता आले नव्हते.
मात्र यावर्षी विठूरायाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते.आषाढी एकादशी निमित्त पहाटे ४ वाजेला भगवंताची आंघोळ करण्यात आली. त्यानंतर काकड आरती झाली, सकाळी सहा वाजेला विठ्ठल रखुमाईवर अभिषेक करण्यात आला.
अभिषेकाला सुरुवातझाली महाआरती यजमान अनिल गागरे यांनी सपत्नीक केले. दिवसभर पावसाचा जोर असतांनाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शन केले.
यावेळी सुमारे २ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. रात्री साडेआठ वाजता सुमधुर संगीतमय भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टीतर्फे करण्यात आले होते.यावेळी गावातील सुवकांनी परिश्रम घेतले.








