Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे स्वीकृत नगरसेवक पदावरून दोघांमध्ये वाद, आ.राजेश पाडवी यांनी घडविला समेट

team by team
August 14, 2021
in राजकीय
0
तळोदा ! प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या संवांद यात्रेचे नियोजन करण्यासाठी  आज सकाळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची तळोदा येथील आमदार कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्विकृत नगरसेवक पदावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. मात्र, आ.राजेश पाडवी यांच्या मध्यस्थीने दोघांमध्ये समेट घडवण्यात आला. त्यामुळे या वादावर पडदा पडला.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची दि. १६ ऑगस्टपासून नाशिक , धुळे व नंदुरबार जिल्ह्यात संवादयात्रा निघणार आहे. सदर संवाद यात्र तळोदा येथेही येणार आहे.या संवादयात्रेच्या नियोजनासाठी  तळोदा येथे
शुक्रवारी दि. १३ ऑगस्ट रोजी आमदार कार्यालयात बैठक  आयोजित करण्यात आली होती. बैठकीत भाजप ओबीसी युवासेलचे जिल्हाध्यक्ष जगदिश परदेशी यांनी भाजप जिल्हा चिटणीस हेमलाल मगरे यांचा स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा कधी घेतला जाईल ? असा प्रश्न उपस्थित केला ? यावर प्रतिक्रिया देत हेमलाल मगरे यांनी आक्रमक भाषेत उत्तर दिल्याने वाद वाढल्याचे बोलले जात आहे . यावेळी आ . राजेश पाडवी व नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी या विषयावर आपण नंतर चर्चा करू असे सांगत शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे समजले . यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी , तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी , पं.स.सदस्य विजय राणा , प्रवीणसिंग राजपूत यांनी व उपस्थित पदाधिकारी यांनी मध्यस्थी करत वादाला आवर घालण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी स्विकृत नगरसेवक हेमलाल मगरे यांनी राजीनामा न देण्याबाबत  ठाम भूमिका घेतली. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली . परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आ. राजेश पाडवी यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडदा पडला.  दरम्यान , या घटनेची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली असून या बाबत जोरदार चर्चा रंगली आहे .
तळोदा येथे तत्कालीन पॅनल प्रमुख व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली२०१७ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निकालानंतर  पुढील पाच वर्षात नंदुरबार पॅटर्नप्रमाणे निवडणूकीनंतर झालेल्या बैठकीत ज्यांनी उमेदवारी केली नाही अथवा माघार घेतली  प्रचारात परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पद फिरते ठेवणार असल्याचे पाडवी यांनी जाहीर केले होते . मात्र कालांतराने त्यावर पहिले दोन वर्षे काहीही हालचाल झाली नाही.यादरम्यान उदेसिंग पाडवी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.नगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून विविध विषय समित्या व स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्विकृत नगरसेवक पदासाठी समाजातील प्रत्येक घटकाला संधी मिळावी म्हणून एका वर्षासाठी निश्चित केले होते. त्यावेळी इच्छुकांनाही आपल्या इच्छेस मुरड घालावी लागली, या सुत्रानुसार माळी समाजातील हेमलाल मगरे यांची वर्णी लागली होती. याबाबत तत्कालीन पदाधिकाऱ्यांनीही मौन पाळून हा मुद्दा रेंगाळत ठेवला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

ट्रकच्या मागील बाजूचे दोर व ताडपत्री कापून ५ लाखाचा माल लंपास

Next Post

नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करावा, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

Next Post
नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करावा, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करावा, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add