नंदुरबार ! प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील तिळासर येथे ट्रकचे मागील बाजूचे दोर व ताडपत्री कापून सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे प्लास्टीक दाण्यांच्या १९० बॅग लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नाथाभाई लकधीरभाई करमटा रा.कजूडा खंभाडीया , द्वारका गुजरात हे त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये ( क्र.जी.जे .१० टीएक्स ८४८५ ) जामनगर येथून प्लास्टीक दाण्याच्या बॅग भरुन हैदराबादकडे जात होते . यावेळी नाथाभाई करमटा हे तिळासर येथील एका हॉटेलजवळ ट्रक लावून कॅबीनमध्ये झोपले होते . या संधीचा फायदा घेत अज्ञातांनी ट्रकच्या मागील बाजूचे दोर कापून व ताडपत्री फाडून ४ लाख ९ ४ हजार रुपये किंमतीचे प्लास्टीकच्या दाण्याच्या १ ९ ० बॅग चोरुन नेल्या . याबाबत नाथाभाई करमटा यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत .