Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारित झाल्यास ग्रुप ॲडमिनवरही होणार कारवाई : जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील

team by team
July 6, 2022
in क्राईम
0
दोन समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारित झाल्यास ग्रुप ॲडमिनवरही होणार कारवाई : जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील

नंदूरबार l प्रतिनिधी
पोलीस दलाचे सोशल मिडियावर बारकाईने लक्ष असून दोन समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारित करणाऱ्यांवर तसेच संबंधित ग्रुप ॲडमिनवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस दलाकडून बैठकीत देण्यात आली.

आगामी बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक कार्यालयात शहरातील शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील होते.

यावेळी अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी, सचिन हिरे, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत पाटील यांच्यासह शांतता समितीचे १९ सदस्य उपस्थित होते. यावेळी शांतता समितीचे सदस्य गजेंद्र शिंपी, मौलाना जकेरिया, डॉ. जमील शेख, मोहन माळी, राजू इनामदार, मोहन खानवाणी, लियाकत बागवान, सुभाष पानपाटील, माणिक माळी, परवेज खान, मालती वळवी यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली.

यावेळी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी सदस्यांच्या शंकांचे निरसन करत माहिती दिली.सण-उत्सव काळात वीजपुरवठा खंडीत होवू नये, यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी, शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासाठी गटारींच्या व स्वच्छतेसाठी पालिका मुख्याधिकारी यांना कळवण्यात आल्याची माहितीही पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिली. आभार पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे यांनी मानले.

पोलीस प्रशासन व शांतता समितीच्या सदस्यांनी नंदुरबार शहरात शांतता राखण्यासाठी अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मिडियाचा जबाबदारी वापर करावा असे आवाहनही पोलीस दलाकडून करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील पूजा :आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

Next Post

चुकीचे निकष लावून भरती प्रक्रिया राबविनाऱ्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करा : आ.आमश्या पाडवी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add