Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चरणमाळ घाटात कांद्यानी भरलेला ट्रक पलटी, घाटात अपघाताचे सत्र सुरूच

team by team
July 5, 2022
in क्राईम
0
चरणमाळ घाटात कांद्यानी भरलेला ट्रक पलटी, घाटात अपघाताचे सत्र सुरूच

नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र गुजरात सीमेजवळील चरणमाळ घाटात अपघातांचा डेली शो सुरू आहे. मध्यरात्री कांद्यानी भरलेला ट्रक तीव्र उताराच्या वळणावर पलटी झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे, तर चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले आहे.

सदर ट्रक पिंपळनेर हुन नवापूर कडे कांदे घेऊन जात असताना अपघात झाला आहे. कालच या ठिकाणी गुजरात परिवहन महामंडळाची एक बस दरीत कोसळणार होती, परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवित हानी टळली होती.

धुळे नंदुरबार या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या जवळ व महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून वाहन चालक याचा वापर करतात परंतु डोंगरदर्‍याच्या या रस्त्यात चरणमाळ गावाखाली असलेला घाट रस्ता अति तीव्र वळण उताराचा असल्याने मालवाहू वाहने अनियंत्रित होऊन अपघात होतात. सदर घाट रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी जेणेकरून अपघात टाळता येईल अशी मागणी केली जात आहे.

चरणमाळ घाट रस्त्यात अपघात झाल्यानंतर गाडीमधील मालाची लूट व्हायची. ही लूट थांबावी यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, नवापूर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी बैठका घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केल्याने लूट थांबली आहे.

तसेच अपघात होताच ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने तत्काळ मदत केली जाते. पोलीस विभागाने उपाय योजना केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील घाट दुरुस्तीकडे उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सुरत- भुसावळ रेल्वेतून खाली पडल्याने ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Next Post

थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी

Next Post
थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी

थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add