नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार पालिका क्षेत्रात खासगी कंपन्यांना सफाईचा ठेका देण्यात आला आहे ही पद्धत रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी पालिका सफाई कामगार संघटनेतर्फे बंद पुकारण्यात आला. ९ ऑगस्ट ला लाक्षणिक बंद करण्यात आला त्याच नंदुरबार जिल्ह्यातील पाचशेहून अधिक पालिका सफाई कर्मचारी सहभागी झाले होते, ची माहिती अखिल महाराष्ट्र सफाई कामगार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार यांनी दिली.
याबाबत श्री.थनवार यांनी सांगितले, राज्यातील सफाई कामगारांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांसह राज्यातील १२ मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मात्र उपयोग झाला नाही म्हणून ९ ऑगस्टला राज्यात पालिका सफाई कामगारांचा एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला. यात नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिकेतील पाचशेहून अधिक कामगार सहभागी झाले होते. जपान मध्ये सफाई कामगारांना सफाई इंजिनिअर असे संबोधले जाते पहाटे चारला उठून गाव-खेडे परिसर स्वच्छ केला जातो सर्व कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत असते मात्र त्याची पर्वा न करता आपले काम केले जाते त्याचप्रमाणे कोरोना कालावधीत देखील सफाई दूत म्हणून नागरिकांच्या दारी जाऊन कामगारांनी कर्तव्य बजावले मात्र राज्य शासनाकडून त्यांना अपेक्षित मोबदला दिला जात नाही. सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते अद्याप देण्यात आलेले नाहीत.
सफाई कामगारांच्या काही मागण्या, पालिका क्षेत्रातील खाजगी सफाई ठेका बंद करण्यात यावा, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सफाई कामगारांची सुमारे एक लाखावर पदे निर्माण करावी. सफाई कामगारांचे भाग्यविधाते कर्मवीर दादासाहेब वासुदेव रावजी चांगले यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. कामगारांना घरे बांधून देण्यात यावी. १९९१ पूर्वी कोर्ट आदेशाने नियुक्त झालेल्या कामगारांना लाड समिती चा लाभ मिळावा. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कामगारांना निवृत्ती वेतन मिळावे. वंशपरंपरेने डोक्यावर महिला वाहतूक करणार्या मेहतर वाल्मिकी समाजाच्या वारसदाराने पडून जात प्रमाणपत्र मागू नये. वारस नोकरी देताना लहान कुटुंब अट शिथिल करावी. सफाई कामगारांचा स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात यावा. यासह विविध मागण्यांचा समावेश आहे या मागण्यांसाठी ९ ऑगस्ट ला बंद पुकारण्यात आला त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असे श्री थनवार यांनी सांगितले.