Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय आदिवासी वस्तीगृहाच्या अधीक्षकांच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

team by team
June 18, 2022
in शैक्षणिक
0
शासकीय आदिवासी वस्तीगृहाच्या अधीक्षकांच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मोहिदा त.श.येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी अधीक्षकांच्या मनमानी कारभाराविरोधात तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले.

शहादा तालुक्यातील मोहिदे त.श.येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आज वस्तीगृहातील समस्या व अधिक्षकाच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलन केले.

आज सर्व विद्यार्थ्यांनी तहसिलदार कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत अधिक्षक आणि वस्तीगृहातील समस्यांबाबत जोरदार घोषणाबाजी केली.
वस्तीगृहातील पाण्याची मोठी समस्या असुन यामुळे खानावळीत देखील अन्न शिजवल्या जात नसल्याने उपाशी पोटी जगायचे कसे असा प्रश्न करत याबाबत अधिक्षक काहीही ऐकुन घेण्यास तयार नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

अधिक्षक हे मद्यपान करुन वस्तीगृह परिसरात येतात समस्या मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला. पुढील पाच दिवसात जर याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर व्यापक आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे वस्तीगृह अधिक्षक यांचा मद्यपान अवस्थेतील एक व्हीडीओ विद्यार्थ्यांकडुन जारी करण्यात आल्याने या साऱ्याप्रकाराबाबत आदिवासी विकास विभागाने साधलेल्या चुप्पी बाबत टिका देखील होत आहे.

वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, पाण्याच्या समस्येमुळे वेळेवर जेवण मिळत नाही, तसेच वस्तीग्रहात कायम अस्वच्छता असते, अस्वच्छतेमुळे आजारी विद्यार्थ्यांकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असते.

आदी मागण्या करीत आज शेकडो विद्यार्थ्यांनी शहादा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करत निवेदन सादर केले आहे. पुढील पाच दिवसात एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या नाहीतर तालुका व जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांनी दिला आहे. यावेळी शहादा शहरमंत्री स्वरुप कुंकड, राजेंद्र निकम, आकाश पटले आदी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा
Previous Post

दहावीच्या परीक्षेत एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा : रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार

Next Post
नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा : रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार

नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा : रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add