Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघात, शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकाचा मृत्यू, चार जण जखमी

team by team
June 15, 2022
in क्राईम
0
ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघात, शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकाचा मृत्यू, चार जण जखमी

शहादा l प्रतिनिधी

शहादा खेतिया रस्त्यावर श्री विष्णूपुरम मंदिरासमोर मारुती स्विफ्ट गाडीचा टायर  अचानक फुटल्याने ती समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली या अपघातात धडगाव येथील एस. व्ही. ठक्कर ज्युनिअर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एका ४५ वर्षीय शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित चार शिक्षकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी शिक्षकांना शहादा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.15 जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास धडगाव येथील एस व्हि ठक्कर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शितल राणे , शरद चंद्रसिंग पाटील, नरेंद्र दादूसिंग गिरासे, रुपेश मधुकर पाटील व शांतीलाल बुधा सूर्यवंशी हे कॉलेज संपल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहाद्याकडे मारुती स्विफ्ट कार (क्र. एम.एच.३९-  एबी- ०९१८) हिच्याने येत असताना शहादा खेतिया रस्त्यावरील दरा फाट्याजवळील श्री नारायण पुरम मंदिरा जवळ या कारचा टायर फुटल्याने सदर गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून रस्त्याच्या खाली १० ते १५ फूट अंतरावर जाऊन पडली. अपघात इतका भीषण होता की सदर गाडी रस्त्याच्या खाली पडताना चार ते पाच वेळा उलटल्याने यातील सर्व सहकारी शिक्षक हे दाबले गेले यात शांतीलाल बुधा सूर्यवंशी हे जागीच ठार झाले असून उर्वरित चौघांना छातीला मानेला डोक्याला व हाताला गंभीर दुखापती झाल्या आहेत.

सदर अपघात घडल्यानंतर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहना जवळ जाऊन त्यातील जखमी शिक्षकांना गाडीच्या बाहेर काढून उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पी.एस.आय. जितेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.

अपघाताची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली प्रत्येकाला महिती मिळताच जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयात नातेवाईकांनी व धडगाव सह तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

शहादा पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्यात येत होती मयत शिक्षक शांतीलाल सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवचिकित्सा केल्यानंतर सायंकाळी उशिरा पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर शहादा येथील अमरधाम येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

पतीने हाताबुक्यांनी बेदम मारहाण करीत पत्नीचा केला खून

Next Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी जिल्हयात 8 गुन्हे दाखल

Next Post
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी जिल्हयात 8 गुन्हे दाखल

सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी जिल्हयात 8 गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add