Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नगरसेवकांवर रोष : रस्त्यांसाठी निधी मंजुर करुन करा, अन्यथा आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार

team by team
June 13, 2022
in राजकीय
0
नगरसेवकांवर रोष : रस्त्यांसाठी निधी मंजुर करुन करा, अन्यथा आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार

नवापूर | प्रतिनिधी

शहरातील सराफ गल्लीतील रस्त्यासाठी ५ वर्षात निधी मंजुर होऊ शकला नाही.तसेच विजेची सोय सुध्दा केली नाही. पाच वर्षात काही प्रभागात चक्क दोन ते तीन वेळा नवीन रस्ते केले गेले. याबद्दल प्रभाग क्र ६ व ७ चा रहिवाशांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी, नगराध्यक्षा हेमलता पाटील,पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन संताप व आक्रोश व्यक्त केला.

सराफ गल्लीतील रस्त्यांसाठी निधी मंजुर करुन आंदोनासह आगामी नगर पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सराफ गल्लीतील रहीवाशांनी निवेदनाद्वारे केला आहे.

नवापूर शहरातील सराफ गल्लीत रस्त्याची पार दुरावस्था झाली असुन प्रभागातील क्र ६ व ७ चा नगरसेवक या पाच वर्षात रस्त्या साठी निधी मंजुर करु शकले नाहीत.याबद्दल रहिवाशांनी आश्चर्य व संताप नगराध्यक्ष हेमलता पाटील यांच्या समोर व्यक्त केला यावेळी प्रभाग क्र ६ व ७ च्या नगरसेविका सुरेखा जगदाळे,महेंद्र दुसाने,प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार आदी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,नवापूर शहरातील श्रीराम मंदीर जवळील रस्ता व शितल सोसायटी भागात रस्त्यांचे दोनदा डांबरीकरण केले गेले.मात्र प्रभाग ६ मधील रस्ता एकदा ही झाला नाही.नवीन पथदिवे लावु शकले नाही.

दोन वर्षापुर्वी डांबरीकरण व्हावे यासाठी सराफ गल्लीतील रहीवाशांनी आंदोलन केले होते.त्यावेळी रस्ता बनवुन देऊ असे आश्वासन नगरसेवकांनी दिले होते. मात्र ५ वर्ष पुर्ण होऊन गेले मात्र रस्ता तर सोडा साधी दुरुस्ती सुध्दा केली नाही.

मात्र या उलट पाच वर्षात राममंदीर गल्लीतील रस्ता दुसर्यांदा तर शितल सोसायटीचा रस्ता तिसर्‍यांदा बनविण्यात येत आहे.सत्ताधार्‍यांमध्येच विकास कामाबाबत भेदभाव होत असल्याची चर्चा आहे.सराफ गल्लीसाठी प्रभाग ६ च्या नगरसेवकांना ५ वर्षात रस्त्यांसाठी निधी मंजुर करता आला नाही.

याबाबत परिसरात रहीवाशांनमध्ये तीव्र संताप व आक्रोश करत नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सराफ गल्लीतील रस्त्यांसाठी निधी मंजुर करुन तो लवकरात लवकर करावा अन्यथा दि १५ ऑगस्टला ध्वजारोहन दिनाचा दिवशी सराफ गल्लीतील रहीवासी घंटानाद आंदोलन करणार आहेत.

तरी ही रस्ता नाही झाला तर १५ दिवसा नंतर नगरपालिके समोर बेमुदत आमरण उपोषण व आगामी नगर पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सराफ गल्लीतील रहीवाशांनी निवेदनाद्वारे केला आहे.

निवेदनार माजी नगरसेवक दर्शन पाटील,माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरीया,उमेश शहा,राकेश राणा,गोपाल मराठे, सुनिल पाटील,प्रेमेंद्र पाटील,दर्शन दिपक पाटील,अनिल पाटील,अतुल माळी,संजय पाटील,शैलेंद्र पाटील,भिकन पाटील,निलेश जोशी,भरत सोनार,हरीष सोनार,नैनेश पाटील,आनंद वशिष्ठ,गिरीष पाथरकर,सागर सोनार,डॉ. विशाल पाटील,दिपु पाटील,गोपाल मराठे,इरफान मुल्ला,फैजल पठाण,आदीचा सह्या आहेत.यावेळी ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे मुसळधार पावसामूळे नवीन वसाहतींमध्ये साचले पाणी

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : १३ जून राशिभविष्य

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : १३ जून राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add