नंदुरबार l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निवडणुक कार्यक्रमाची वाट न पाहता सदस्यता नोंदणीवर भर द्या. यंदा कुठल्याही परिस्थितीत विद्यापीठावर शिवसेनेचाच झेंडा फडकवा असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी केले.
नंदुरबार येथील पालिकेच्या स्व.अटल बिहारी वाजपेयी सभागृहात युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय सचिव अविष्कार भुसे,
जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, सहसचिव चैतन्य बनसोडे, जिल्हा विस्तारक ॲड पंकज गोरे,कृषी सभापती गणेश पराडके, विराम कवाडिया,परेश यादबोले उपस्थित होते.यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी उपस्थित युवा सैनिकांना मार्गदर्शन केले.
पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. मुंबई विद्यापीठ प्रमाणेच जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी सक्रिय सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी भर द्यावी. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची वाट पाहू नये. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
यावेळी विभागीय सचिव अविष्कार भुसे, जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, जिल्हा विस्तारक ॲड पंकज गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी पं.स उपसभापती कमलेश महाले, तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे, महानगरप्रमुख विजय माळी, युवासेना जिल्हा सरचिटणीस बंटी पाटील,मुन्ना पाटील,माजी जि.प सदस्य डॉ. सयाजीराव मोरे, उप तालुका प्रमुख कृष्णदास पाटील आदी उपस्थित होते.








