नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील गोमाई नदी किनाऱ्याहून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किंमतीच्या दोन इलेक्ट्रिक मोटार लंपास केल्या.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील गोमाई नदी किनारी ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत असलेल्या ५६ हजार रुपये किंमतीच्या १० हॉर्स पॉवरच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी चोरट्यांनी चोरुन नेल्या.
याबाबत हरी दत्तू पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.संदिप खंडारे करीत आहेत.