Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इशारा : आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
June 7, 2022
in आरोग्य
0
जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्या काही कुत्र्यांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव तो रोखण्यासाठी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आपत्ती झाल्यास याबाबतची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनास किंवा जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यास अनुसरून जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी विविध विभागांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. नर्मदा व तापी या दोन प्रमुख नद्या जिल्ह्यातून वाहतात. प्रकाशा, सारंगखेडा बॅरेज, अमरावती, रंका,चौपाळे, चिरडा, देवळीपाडा, मेंदीपाडा, ढोंग, नेसू, विसरवाडी, भरडू, रायगण, मुगधन, खेकडा, सुळीपाडा, रंगावली, दरा, देहली, नर्मदा शिवण इत्यादी मध्यम व लघु प्रकल्प आहेत.

2006 मध्ये तळोदा तालुक्यातील सोजराबारी येथे दरड कोसळल्यामुळे दुर्घटना, 2016 मध्ये मान्सुन काळात अतिवृष्टीमुळे झालेली पाचोराबारी दुर्घटना, 2018 मध्ये पुरामुळे नवापूर येथे झालेले नुकसान व सन 2019 मध्ये जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी झाली होती. इत्यादी बाबी विचारात घेता सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

त्यानुसार 1 जून 2022 पासून जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित केला आहे. तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीची माहिती तत्काळ 02564-210006 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 यावर कळवावी.

गंभीर धोक्याचे ठिकाणी वावर असणाऱ्या लोकांची जीवित व वित्त हानी होवू शकते यासाठी जिल्ह्यातील असे धोकादायक ठिकाणांची जागा निश्चित करुन त्याठिकाणी खबरदारीचे उपाय म्हणून सूचना फलक लावावेत.

याशिवाय सर्व विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, व्हॉटस ॲप क्रमांकांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. या कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोबाईल सुरू ठेवावेत.

आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या काळात व आपत्ती काळानंतर संबंधित प्रत्येक विभागाने नियोजनाप्रमाणे तत्काळ प्रतिसाद द्यावा. सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला सादर करावी.

जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवसथापन प्राधिकरणाची मॉन्सून पूर्व आढावा बैठक घेवून सर्व विभागांना आपापली जबाबदारी, कर्तव्याची माहिती दिली आहे. सर्व मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रणा तपासून घेतल्या आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यकतेनुसार सूचना देण्यात येतील.
मनीषा खत्री
जिल्हाधिकारी तथा अध्यक्षा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नंदुरबार

बातमी शेअर करा
Previous Post

क्रिकेट टीम हरली म्हणून चक्क एकाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धडगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी धर्मवीर चित्रपटाचा स्पेशल शो, जि. प. सभापती गणेश पराडके यांनी केले आयोजन

Next Post
धडगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी धर्मवीर चित्रपटाचा स्पेशल शो, जि. प. सभापती गणेश पराडके यांनी केले आयोजन

धडगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी धर्मवीर चित्रपटाचा स्पेशल शो, जि. प. सभापती गणेश पराडके यांनी केले आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add