नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरी क्लब नंदनगरी क्लबने सन २०२१-२२ या रोटरी वर्षात आतापर्यंत २३४ उपक्रम राबविले. या उपक्रमांच्या माध्यमातून क्लबने सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केले. क्लबच्या कार्याची दखल घेत क्लबच्या पदाधिकार्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
रोटरी क्लब नंदनगरी क्लबने सन २०२१-२२ या रोटरी वर्षात आतापर्यंत २३४ प्रोजेक्ट (उपक्रम) घेतले. त्यात ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार-सन्मान, गरोदर महिलांना प्रोटीन आर्यनच्या गोळ्या, वैद्यकीय तपासण्या तसेच गरजू विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन शालेय स्तरावर शैक्षणिक साहित्य वाटप व विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष तसेच डिजीटल वर्ग स्थापन, करणे, रस्त्यावर फिरणार्या गरजू व अनाथ व्यक्तींना पादत्राणे वाटप,
अल्पदरात डायलेसिसर सेंटर चालविणे, वर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा कारागृहात व इस्कॉन मदिराच्या परिसरात पाचशेहून अधिकारी वृक्ष लागवड करणे याप्रमाणे विविध कार्यक्रम राबविले. याची दखल घेत रोटरी डिस्ट्रीक्ट ३०६० अंतर्गत
सुरत येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव अनिल शर्मा व शब्बीर मेमन यांना सन्मानित करण्यात आले. क्लबला डिस्ट्रीक्ट सायटेशन, पेट सेट, रोटरीडे चेअर सर्व्हीस प्रोजेक्ट, ग्रेट पेजेंटेशन असे एकुण सात पुरस्कार देवून क्लबला गौरविण्यात आले.
सदर पुरस्कारात रोटरीचे बीओडी व मेजर डोनर विशाल चौधरी, निलेश तवर, जितेंद्र सोनार, इसरार सैय्यद, नरेश नानकाणी, मदनलाल जैन, शितल पटेल, प्रितेश बांगड, रमाकांत पाटील, फखरोद्दीन बोहरी व सर्व सदस्यांचा सहभाग आहे व सर्वांचा हा सन्मान आहे, असे क्लबचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी सांगितले.








