Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी मागणाऱ्या महिलेसह पोलीस कर्मचारी व तथाकथीत पत्रकाराला अटक

team by team
June 1, 2022
in क्राईम
0
अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी मागणाऱ्या महिलेसह पोलीस कर्मचारी व तथाकथीत पत्रकाराला अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
अश्लील व्हिडीओ कॉल करुन ते रेकॉर्ड केल्याचे भासवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देवून खंडणी मागणाऱ्या महिलेसह पोलीस कर्मचारी व तथाकथीत पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात विशेष करुन शहरात व्यापारी, नोकरदार वर्ग यांच्याशी अश्लील व्हिडीओ कॉल करुन ते रेकॉर्ड केल्याचे भासवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देवून त्यांचेकडून खंडणी मागण्याच्या तसेच त्या स्वीकारण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत्या.

याबाबत नंदुरबार पोलीसांनी तक्रारदार यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु बदनामीच्या भितीने कोणीही तक्रारदार हे पोलीस ठाण्याला जावून गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवित नव्हते.
दि. 31 मे 2022 रोजी म्हसावद ता. शहादा येथील एक 43 वर्ष नोकरदार इसम हा घाबरलेल्या अवस्थेत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांना भेटण्यासाठी आला.

त्याची अवस्था पाहून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी त्यास शांत केले.तसेच त्यास धीर देवून त्याची विचारपुस करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.परंतु पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे आस्थेने विचारणा केल्याने त्याने त्याची हकीकत सांगण्यास सुरुवात केली.

सदरची हकिगत हा गुन्ह्याचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले यावरुन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तक्रारदार इसमाची सखोल विचारपुस करण्यास सांगितले. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी केलेल्या चौकशीत तक्रारदार याने अत्यंत गंभीर प्रकार सांगितला.

सदर तक्रारदार इसमास दि. 9 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेने फोन केला व स्वतःची ओळख न देता बोलू लागली. त्यानंतर ती महिला तक्रारदार यास वारंवार फोन करु लागली.काही दिवसांनी त्या अनोळखी महिलेने तक्रारदार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

परंतु तक्रारदाराने त्या महिलेस भेटण्यास नकार दिला.त्यामुळे त्या महिलेने तक्रारदार यांना व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉल दरम्यान सदर महिलेने अश्लील चाळे सुरु करुन तक्रादाराला उत्तेजीत केले व त्या महिलेने सदरच्या अश्लील चाळ्याबाबतचा व्हिडीओ तयार करुन घेतल्याचे सांगितले. तक्रारदार यास सुरुवातीस सदर घटनेचे कोणतेही गांभीर्य वाटले नाही परंतु सदर महिलेने दुसऱ्या दिवसापासून तिचे खरे स्वरुप दाखविण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी तक्रारदार यास त्याचे ओळखीचा पोलीस छोटु शिरसाठ याने फोन करुन बदनामी करण्याची भिती दाखवून मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. तसेच तक्रारदार यास प्रचंड मानसिक त्रास देवून तसेच त्याची बदनामी करण्याची भिती दाखवून 14 लाख रुपयांची मागणी केली.

परंतु तक्रारदार यांची पैसे देण्याची इच्छा नसतांना देखील सामाजीक प्रतिष्ठा व बदनामीच्या भितीने तसेच व्हिडीओ कॉलची असलेली क्लीप नष्ट करण्याच्या अटीवर छोटु शिरसाठ पोलीस याचे मार्फतीने तक्रारदार याने सदर महिलेस 9 लाख रुपये दिले.परंतु काही दिवसांनी एक तथाकथीत पत्रकार देखील तक्रारदार यास पुन्हा 9 लाख रुपयांची मागणी करु लागला,

त्यावेळेस तक्रारदार याने छोटु शिरसाठ पोलीस तसेच सदर महिला यांचेशी संपर्क साधून व्हिडीओ कॉल असलेली क्लीप का डिलीट केली नाही? अशी विचारणा केली.परंतु सदर महिला व छोटु शिरसाठ पोलीस यांनी तक्रारदार यास कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने व पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली.

तसेच तथाकथीत पत्रकाराच्या बाबतीत सुध्दा तक्रारदार यास बदनामीची भिती दाखवून छोटु शिरसाठ याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळेस तक्रारदार याच्या एका मित्राने त्यास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांना भेटण्यास सांगून ते न्याय देतील असे सांगितले.

त्यामुळे तक्रारदार हा पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे आला होता.सदरची घटना अतिशय गंभीर होती.तसेच तक्रारदार हा आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत पोहोचल्याचे त्याच्या मनस्थितीवरुन

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना दिसून आले तसेच ह्या घटनेचा समाजावर विपरीत परीणाम होत असल्यामुळे पोलीस अधीक्षक,नंदुरबार पी. आर.पाटील यांनी याबाबत अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचेशी चर्चा करुन तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना ताबडतोब कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

त्यावरुन शहादा पोलीस ठाणे येथे भा.द.वि.कलम 384, 385,389,363,323,504,506,34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी),66 (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर घटनेबाबत शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर दाखल गुन्ह्यात अश्लील व्हिडीओ कॉल करणारी महिला, तथाकथीत पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) रा. दत्त कॉलनी,कोरीट रोड, नंदुरबार व पोलीस छोटु तुमडु शिरसाठ रा.सदाशिव नगर,शहादा ता.शहादा जि.नंदुरबार यांना ताब्यात घेवून तात्काळ अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी हे सद्या शहादा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत असून त्यांना न्यायालयात रिमांडकामी हजर करण्यात येत आहे.नंदुरबार तसेच इतर राज्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की,अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ कॉल करुन व बदनामी करण्याची भिती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या
नागरिकांसोबत झाले असतील अशा नागरिकांनी कसलीही भिती न बाळगता समोर येवून पोलीस ठाण्याला तक्रार द्यावी.

तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर. पाटील,अपर पोलीस अधीक्षक,नंदुरबार विजय पवार,उप विभागीय पोलीस अधीकारी,शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत,पोलीस निरीक्षक संदीप पाटील,सहा पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे,शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माया राजपुत तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अमंलदारांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

Next Post

उल्लेखनिय कार्याची दखल घेत रोटरी क्लब नंदनगरीचा विशेष गौरव

Next Post
उल्लेखनिय कार्याची दखल घेत रोटरी क्लब नंदनगरीचा विशेष गौरव

उल्लेखनिय कार्याची दखल घेत रोटरी क्लब नंदनगरीचा विशेष गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add