नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील किळवणपाडा शिवारात एका नाल्यात २० हजार रुपयांचा अवैधरित्या साग चौपाट नग व काही बारीक पाट्या ५६ नग मिळून आले. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव यांना मिळालेल्या माहितीनुसार सह वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक पथकासह किळवणपाडा
शिवारात एका नाल्यात गावात जावून पाहणी केली असता अवैधरित्या साग चौपाट नग व काही बारीक पाट्यांचे ५६ नग मिळून आले. ते जप्त करून शासकीय वाहनाने वाहतूक करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला. सदरचा मुद्देमालाची किंमत २० हजार रुपये आहे. सदर कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार धनंजय पवार व प्रादेशिक नवापूर वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल,
वनपाल वडकळंबी सुनिता पाटील, वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, विकास शिंदे, संतोष गायकवाड, अनिल वळवी, अमोल गावीत, गिरीश वळवी, अशोक पावरा, पिकी बडगुजर, दिपाली पाटील, भाग्यश्री पावरा,
वाहन चालक गुरव, चमाऱ्या गावीत यांनी सहभाग घेतला. सदरची कार्यवाही धुळे वनसंरक्षक श्री. पगार, नंदुरबार उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभाग शहादा कृष्णा भवर आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








