नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील महालक्ष्मी नगर, गोविंद नगर, तुलसी नगर व मिरा नगर येथे महावितरणने चार ठिकाणी टाकलेल्या धाडीत सुमारे दोन लाख रुपये किंमतीची वीज चोरी उघडकीस आणली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील महालक्ष्मी नगरात गोविंद दशरथ परदेशी यांनी ६५ हजार ९०० रुपये किंमतीची ३२६१ युनिट, गोविंद नगरातील भरत मुरार पाटील यांनी ६४ हजार ९० रुपये किंमतीची ३२६१ युनिट,
तुलसी नगरात विलास अशोक पाटील याने ६४ हजार ३६० रुपये किंमतीची १४०१ युनिट व मिरा नगर येथील बन्सीलाल दगा वसईकर यांनी ६५ हजार ९०० रुपये किंमतीची २०४८ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले.
याबाबत महावितरणच्या भरारी पथकातील अतिरीक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भारतीय विद्युत अधिनियम सन २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








