Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथे सराफाच्या दुकानातून सात दागिने चोरणाऱ्या महिलेला लासलगाव येथून अटक

team by team
May 26, 2022
in क्राईम
0
प्रकाशा येथे सराफाच्या दुकानातून सात दागिने चोरणाऱ्या महिलेला लासलगाव येथून अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथून व्यापाऱ्याला भुरळ घालून सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेस लासलगाव पोलिसांनी अटक केली. अश्विन बाळकृष्ण सोनार (रा. प्रकाशा, शहादा, जि. नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकाशा येथे दि. २० मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सोनार गल्लीतील परिणीता ज्वेलर्स या सराफाच्या दुकानातून दोन महिलांनी काऊंटरवरील गल्ल्यात हात घालून ७ लाखांचे दागिने असलेला डबा लंपास केला होता.

या चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानाबाहेर दोन तरुण देखील उभे असल्याचे कॅमेऱ्यात दिसत होते. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत दररोज गस्तीसाठी साध्या वेशात पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहे. वरील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचे तपासी अधिकारी राजन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक शहादा पोलीस ठाणे यांनी व्हॉटसॲप सोशल मीडियावर संशयित महिलांचे फोटो व्हायरल केले होते.

फोटोच्या निरीक्षक माहितीच्या आधारे संजयनगर, लासलगाव जिल्हा नाशिक येथील सरला कापसे (३०) हिची तिच्या राहत्याघरी झडती घेण्यात आली. तिच्या ताब्यात सोन्याच्या धातूच्या पोत, मणी, मंगळसूत्र मिळून आल्याने त्या सोन्याच्या वस्तूबाबाकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.

तेव्हा त्या महिलेस पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने मीना कापसे व रामदास शिंदे यांच्यासोबत परिणीता ज्वेलर्स, प्रकाशा, ता. शहादा, जिल्हा नंदुरबार येथून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.

त्या महिलेकडून अंदाजे 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.ही कामगिरी सहाय्यक पोलीस राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दागिने असणाऱ्या पर्सची घरातून चोरी, ६२ हजाराचा ऐवज लंपास

Next Post

जिल्हाधिकारी मनिषा खत्री आल्या ॲक्शन मोडवर गोमाई नदी पुलाची पाहणी करीत अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add