Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन

team by team
May 25, 2022
in राज्य
0
नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविण्यता विभागातंर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोयायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयेाजन करण्यात येत आहे.

या सप्ताहात सहभागी होण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सने 31 मे 2022 पर्यंत संकेतस्थळावर अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, विजय रिसे यांनी केले आहे.

स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्टार्टअप्सची नाविण्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

याअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी प्रथम 100 स्टार्टअप्सना त्यांच्या नाविण्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मा.मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी मिळेल.

व त्यातील विजेत्या 24 स्टार्टरअप्सना त्यांची नाविण्यापूर्ण उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्वावर संबंधित शासकीय विभागाबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत 15 लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश (वर्क आर्डर) दिले जातील.

यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जल व्यवस्थापन) स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप वीक आजवर चार वेळा यशस्वीपणे संपन्न झाला असून विजेत्या स्टार्टअप्सने राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागासोबत काम पूर्ण केले आहे. यावर्षी देखील प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप वीक 2022 चे आयोजन करण्यात येत आहे.

या सप्ताहात सहभागी होण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सने www.msins.in या संकेतस्थळावर 31 मे 2022 पर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ईमेल

nandurbarrojgar@gmail.com अथवा 02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच नंदुरबार शहरात. आज रंगणार स्थानिक बालकलावंतांचा बालनाट्य महोत्सव

Next Post

बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी सात भरारी पथक गठित

Next Post
बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी सात भरारी पथक गठित

बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी सात भरारी पथक गठित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add