Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच नंदुरबार शहरात. आज रंगणार स्थानिक बालकलावंतांचा बालनाट्य महोत्सव

team by team
May 25, 2022
in सामाजिक
0
जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच नंदुरबार शहरात. आज रंगणार स्थानिक बालकलावंतांचा बालनाट्य महोत्सव

नंदुरबार l प्रतिनिधी
बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या

बालकलावंतांचा बालनाट्य महोत्सव आज दि.२५ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच नंदुरबार शहरात स्थानिक बालकलावंतांचा बालनाट्य महोत्सव रंगणार आहे.

गेल्या दहा दिवसापासून नंदुरबार येथील राजे शिवाजी माध्यमिक विद्यालयात बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरु होते.

या शिबिरातील बालकलावंतांची पाच बालनाट्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे सकाळी ११ वाजेपासून सादर करण्यात येणार आहेत. त्यात बालनाट्य लेखक आसेफ अन्सारी लिखित ‘माणूस माणूस प्राणी, प्राणी-प्राणी माणूस’, ‘जय हो फॅन्टसी’, ‘ओसामा’, ‘कस्तुरी’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे..?’ या बालनाट्यांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची सलग पाच बालनाट्य स्थानिक बालकलावंत सादर करणार आहेत. सदर बालनाट्य प्रशिक्षणात गेल्या दहा दिवसापासून बालकलावतांना महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई येथील नाट्यकला निदेशक आसेफ अन्सारी हे प्रशिक्षण देत होते.

या बालनाट्य महोत्सवाचा समारोप सायंकाळी ४ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड.सीमा वळवी, माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, चिंतामणी महिला एज्युकेशन संस्थेचे सचिव युवराज पाटील, हस्ती पब्लिक स्कुल, दोंडाईचाचे चेअरमन कैलास जैन, ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर,

पत्रकार तथा साहित्यीक रमाकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर कार्यक्रमादरम्यान जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा आयोजन समितीतर्फे दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ हा पुरस्कार पत्रकार तथा साहित्यीक रमाकांत पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सदर बालनाट्य महोत्सव हा सर्वांसाठी विनामुल्य असून या बालनाट्य महोत्सवात नाट्यप्रेमींनी उपस्थिती लावून बालनाट्यांचा आस्वाद घ्यावा व बालकलावंतांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन नागसेन पेंढारकर, राजेश जाधव, मनोज सोनार, रवीदा जोशी, राहुल खेडकर, तुषार ठाकरे, जितेंद्र पेंढारकर, चिदानंद तांबोळी, तुषार सांगोरे, रविंद्र कुलकर्णी, आशिष खैरनार, संतोष पाटील, गणेश महाजन, गिरीष वसावे, हेमंत पाटील आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अमळथे येथे शॉर्ट सर्किटमुळे 8 एकर जळून खाक,आगीत शेतकरी जखमी

Next Post

नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन

Next Post
नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन

नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add