Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश

team by team
May 24, 2022
in राज्य
0
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणारी महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे. अन्यथा बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करावा, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

डांगे यांनी जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलाची आढावा बैठक मंगळवारी (२४ मे) घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार व नंदुरबार मंडलाचे अनिल बोरसे मंचावर उपस्थित होते.

यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले की, ‘ना नफा, ना तोटा’ तत्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रुपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे थकबाकीचा मोठा डोंगर आहे.

या गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा सध्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. वीज ही मूलभूत गरज असतानाही ग्राहक इतर अनेक सेवांचे पैसे देतात. मात्र मूलभूत गरज असलेल्या विजेचे बिल भरत नाहीत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी दिले.

ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल अचूक व वेळेत देण्यासाठी मीटर एजन्सी नेमण्यात आलेल्या आहेत. या एजन्सींना मीटर रीडिंग घेताना फोटोंचा दर्जा सुधारण्यास व अचूक काम करण्यास सांगितले आहे. मात्र कार्यक्षमता न सुधारल्यास संबंधित मीटर रीडिंग एजन्सींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी विविध विषयाचा आढावा घेऊन या महिन्यात वीजबिल वसुलीसह ग्राहकसेवा आणखी गतिमानतेने करण्याचे आवाहन केले.

बैठकीला जळगाव परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, जळगाव मंडलातील सर्व उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, अधिकारी व मीटर रीडिंग एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

संत भीमा भोई जयंती निमित्त बुधवारी प्रतिमापूजन व भव्य शोभायात्रा

Next Post

खुंटामोडी या ग्रामीण भागातून धुळे मुक्कामी बससेवा सुरु

Next Post
खुंटामोडी या ग्रामीण भागातून धुळे मुक्कामी बससेवा सुरु

खुंटामोडी या ग्रामीण भागातून धुळे मुक्कामी बससेवा सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add