Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पहिल्या दिवसापासूनच स्काऊट- गाईड, कब- बुलबुल, यांची नोंदणी करा : प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी

team by team
May 24, 2022
in शैक्षणिक
0
पहिल्या दिवसापासूनच स्काऊट- गाईड, कब- बुलबुल, यांची नोंदणी करा :  प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी

म्हसावद l प्रतिनिधी
येत्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसा पासूनच स्काऊट- गाईड, कब- बुलबुल, यांची नोंदणी करायला सुरुवात करा व कोरोना काळामध्ये थांडवलेले उपक्रम स्काऊट गाईड मार्फत भरून काढा.

यासाठी पहिल्या दिवसापासूनच सर्वांनी कामाला लागावे असे जिल्हा नियोजन बैठकीचा वेळी अध्यक्षस्थाना वरून नंदुरबार भारत स्काऊट गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त असे की,नंदुरबार भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा ऑफिसमध्ये नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्ष नंदुरबार भारत स्काऊट गाईडचे जिल्हाध्यक्ष यशवंत पाटील होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा स्काऊट गाईडचे मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, जिल्हा आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, जिल्हा मुख्यालय आयुक्त पुष्पेन्द्र रघुवंशी,

जिल्हा मुख्यालय आयुक्त गाईड वर्षा जाधव शहादा, अनिता चौधरी नंदुरबार, नूतन वर्षा वळवी नंदुरबार, सुषमा शहा नंदुरबार, सुहासिनी नटावदकर नंदुरबार, सहाय्यक जिल्हा आयुक्त शेखर धनगर, रमेश चौरे, डी. डी. राजपूत, रमेश देसले, आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम स्काऊट गाईड चा प्रार्थनेने बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन ज्ञानेश्वर सावंत यांनी केले. स्काऊट आणि गाईड चळवळ विषयी माहिती हेमंत पाटील यांनी दिली. व येत्या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये कोण कोणते उपक्रम  राबवायचे आहेत याची सखोल माहिती संघटन आयुक्त गाईड कविता वाघ यांनी दिली.
.
त्यानंतर भारत स्काऊट गाईडचे मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी नियुक्ती केलेले व राज्य मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या सहीने आलेले  अधिकार पत्र जिल्ह्यामध्ये वीस सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट व गाईड यांना देण्यात आले.

तसेच पंतप्रधान ढाल स्पर्धेचे प्रमाणपत्र ज्याचा वर पंतप्रधानांची सही आहे. ते प्रमाणपत्र सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे स्काऊटचे प्रमुख नरेंद्र गुरव यांना सतीश चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन हजार 56 शाळा आहेत. या प्रत्येक शाळेमध्ये स्काऊट आणि गाईड ची चळवळ पोचली पाहिजे. तसेच संख्यात्मक सोबत गुणात्मक देखील वाढ झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

तर अध्यक्षीय भाषण करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये शाळेतील सर्वच उपक्रम जवळपास थंडावले होते. आता त्याला चालना देणे गरजेचे आहे. कोरोणा काळ संपलेला आहे.

म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 13 जून पासून शिक्षकांनी स्काऊट गाईड, कब बुलबुल याची युनिट नोंदणी करून. पहिल्या दिवसापासूनच कामाला लागावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच उपक्रम राबवायचे आहेत.

तसेच शिक्षकांना देखील बेसिक, प्रगत, पर्यंतचे शिक्षण प्रशिक्षण जिल्हा संस्थेने द्यावे व जिल्हा मेळावा चे देखील नियोजन असे सांगितले.
दिवाळीपूर्वी जिल्हा मेळावा घ्या,

नॅशनलची जांबोरी राजस्थान मध्ये आहे त्या ठिकाणी आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून शिक्षक सहभागी होतील अशा पद्धतीचे नियोजन करा असे त्यांनी सांगितले.

तसेच तोरणमाळ येथील प्रशिक्षण केंद्र देखील ओस पडत आहे. त्याकडे नंदुरबार भारत स्काऊट आणि गाईड यांनी लक्ष घालून तेथील प्रशिक्षण केंद्र विकसित करावे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन कविता वाघ, प्रस्तावना ज्ञानेश्वर सावंत, तर आभार नरेंद्र गुरव यांनी मानलेत.

 

बातमी शेअर करा
Previous Post

असली प.स.च्या पोटनिवडणूकिसाठी शेवटच्या दिवशी चार अर्ज दाखल

Next Post

मंदाणे गावाची सुकन्या सरोज देसले बनली धुळ्याची वनक्षेत्रपाल

Next Post
मंदाणे गावाची सुकन्या सरोज देसले बनली धुळ्याची वनक्षेत्रपाल

मंदाणे गावाची सुकन्या सरोज देसले बनली धुळ्याची वनक्षेत्रपाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add