नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी आमदार शिरीषकुमार सुरूपसिंगजी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी आमदार शिरीषकुमार सुरूपसिंगजी नाईक यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांनी केली.काल दि.23 मे रोजी ही नियुक्ती केली.
नंदूरबार जिल्हयात मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या राजीनाम्यानंतर आतापर्यंत अध्यक्ष मिळालेला नाही.गेल्या दीड दोन वर्षांपासून नंदूरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपद दिलीप नाईक सांभाळत होते.
आता पुन्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद पुन्हा प्रभारीकडे सोपवण्यात आले आहे. आमदारकीच्या कार्यकाळात आमदार शिरीषकुमार सुरूपसिंगजी नाईक यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे.त्यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाल्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.








