नंदुरबार | प्रतिनिधी
प्रकाशा येथील गोमाई नदीच्या पात्रात नंदुरबार येथील ५७ वर्षीय महिलेला आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी प्रकाशा येथील गोमाई नदीच्या पात्रात महिलेचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सखाराम शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.सखाराम शिंदे, करजई येथील पिंटू पाटील, प्रकाशा येथील ग्रामसेवक बी.जी.पाटील, राहुल पाटील व हेकॉ महेरसिंग वळवी यांनी पट्टीचे पोहणारे सिताराम भगत यांना पाचारण केले. त्यांनी सदर महिलेचे मृतदेह बाहेर काढले.

या घटनेची माहिती सोशल मीडियावर वायरल झाली. त्यामुळे शहादा येथील गांधी नगर भागात राहणारे धरमदास जांभळे यांनी पोलिसांशी संपर्क साधून सदर महिला ही त्यांची सासु शकुंतलाबाई रमणलाल नांदेडकर (वय वर्ष ५७) असल्याचे सांगितले.
सदर महिला ही नंदुरबार येथील गुजर न्हावी गल्ली हाट दरवाजा या भागातील रहिवासी असल्याचे समजले. यावरून प्रकाशा पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. ती शहादा येथे वास्तव्यास आहे. मुलाचे नंदुरबार येथे सलूनचे दुकान असल्याची माहिती दिली.








