नंदुरबार l प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली आहे. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२३ मे रोजी सकाळी ११ वाजता उपोषण करण्यात आले.
ओबीसींचा मागणीसंदर्भात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, राजेंद्रकुमार गावित,, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी,
भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल शेंडे भाजपा ओबीसी मोर्चा नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्ष अनामिका चौधरी, सपना अग्रवाल, किन्नरी सोनार आदी पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थीत होते.
दरम्यान भाजपातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले त्यात म्हटले आहे कि, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याबाबत समर्थनपर निवेदन इंपेरिकल डेटा जमवण्यासाठी मध्य प्रदेश मॉडेल चे अनुकरण करावे अशा मागणीचे निवेदन पाठविण्यात आले.








