Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.डॉ.हिना गावितांच्या हस्ते सहा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे अनुदानपत्राचे वाटप

team by team
May 23, 2022
in राजकीय
0
खा.डॉ.हिना गावितांच्या हस्ते सहा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे अनुदानपत्राचे वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील सहा निराधार वृध्द महिला व पुरुषांना संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा एक हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेच्या अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना मिळवुन देण्यासाठी क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील तांबोळी गल्ली, मराठा गल्ली, गणपती मंदिर, सिध्दीविनायक चौक परिसरातील राहणारे सहा निराधार वृध्द महिला व पुरुष हे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासुन वंचित होते.

या लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळावे, यासाठी नंदुरबार तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीकडे प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्ताव मंजुर होवुन लाभार्थ्यांना अनुदान मिळावे, यासाठी संसदरत्न खा.डॉ.हिना गावित, माजी मंत्री तथा आ.डॉ.विजयकुमार गावित, जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनाखाली क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांनी पाठपुरावा केला.

या पाठपुराव्यानुसार लक्ष्मीबाई गिरधर मराठे, मिराबाई रणछोड तांबोळी, लताबाई अनिल भावसार, पार्वतीबाई भिमा मराठे, अंबादास नरहरी कासार, रणछोड गंगाराम तांबोळी या सहा लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत.

सदर निराधार लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा मिळणारे 1 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. अनुदान मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना संसदरत्न खा.डॉ.हिना गावित, माजी मंत्री तथा आ.डॉ.विजयकुमार गावित व जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते मंजूर अनुदान पत्राचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेश मराठे आदी उपस्थित होते. प्रविण मराठे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाचा लाभासह विविध योजनांचे लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केले आहेत. या पाठपुराव्यामुळे अनेक गोरगरिबांना योजनांचे लाभ मिळाले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण समितीस यश

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्या काही कुत्र्यांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव तो रोखण्यासाठी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add