नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील श्रीखेड येथे शेतीचा हिस्सा न दिल्याने भावानेच भावाचे काठीने डोके फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील श्रीखेड येथे वडीलोपार्जित शेती हिस्स्यावरुन खंबर करणसिंग सोनवणे व विनोद करणसिंग सोनवणे या दोघा भावांमध्ये वाद निर्माण झाला. यात रागाच्याभरात खंबरसिंग सोनवणे यांना विनोद सोनवणे याने काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत खंबर सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात विनोद सोनवणे याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.अजित गावित करीत आहेत.