म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील फेस येथील डॉ.महंत संवत्सरकर बाबा यांना महानुभाव साहित्यावर पी.एच डी.मिळाल्याबद्दल नागपूर येथे कै. रावसाहेब गं.म.ठवरे पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला .
शहादा तालुक्यातील फेस येथील श्रीकृष्ण मंदिराचे संस्थापक डॉ . महंत संवत्सरकर बाबा महानुभाव यांना महानुभाव साहित्य पी .एच.डी. संशोधक म्हणून नागपूर येथील महानुभाव साहित्य , शिक्षण , संशोधन प्रतिष्ठान तफै कै . रावसाहेब गं . म .ठवरे पुरस्कार कविश्वराचार्य माहुर पिठाधिश यांचा हस्ते प्रदान करण्यात आला . स्मृती प्रार्थना सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी माजी कुलगुरू डॉ .पंकज चांदे , सोनपेठकर बाबा , विश्वनाथ कपाटे , पुरुषोत्तम ठाकरे , आनंदराव गजभिये , केशरताई मेश्राम , साजनजी शेंडे , छत्रपती शेंडे , ॲड . संतोष रामटेके , चंदाताई वानखेडे आदी उपस्थित होते . यावेळी संशोधक डॉ . संवत्सकर बाबा , डॉ . नितेश रामटेके , डॉ .वृशाली ऊजेडे , डॉ .विद्या वासनिक यांनी मनोगत व्यक्त केले .








