नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे मोटार सायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून , 3 लाख 35 हजार रुपये किमंतीच्या 8 महागड्या दुचाकी जप्त करण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी मासिक गुन्हे बैठकीत मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी निर्देश दिले.
वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण,वेळ,दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इथ्यंभूत माहिती घेवून रेकॉर्डवरील,जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरून जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवून होते.तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.दि 26 एप्रिल 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमंलदार नंदुरबार शहरात गस्त करीत असतांना नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरात भोणे फाटा भागात दोन इसम कमी किंमतीत मोटर सायकल विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सांगितली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथके तयार केली तसेच त्याबाबत पथकांना योग्य ते नियोजन करून सापळा लावण्याचे ठरविले व पुढील योग्य तो कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ भोणे फाटा परीसरात जावून खात्री केली असता एका पान टपरी जवळ दोन इसम एका बिना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून आले.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याकडे जात असतांना त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन्ही संशयीत इसमांनी मोटार सायकल तेथेच सोडून पळून गेले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयीत इसमास पाठलाग करुन ताब्यात घेतले व दुसरा इसम पळून जाण्यात यशस्वी झाला.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाला त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव खोजल्या वण्या तडवी रा.बिजरीगव्हाण ता. अक्कलकुवा ह.मु. तळोदा कणकेश्वर मंदिर असे सांगितले.त्यास त्याच्याजवळ असलेल्या मोटर सायकल बाबत विचारपुस करता तो उडवा-उडवीची उत्तरे देवु लागला.म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय नंदुरबार येथे आणुन त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की,सदरची यूनिकॉर्न मोटर सायकल ही त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तड़वी अशांनी काही महिण्यापुर्वी गुजरात राज्यातून चोरून आणली असे सांगितल्याने 50 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची यूनिकॉर्न मोटार सायकल संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हस्तगत करण्यात आली आहे.तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतास अधीक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी याच्या मदतीने नंदुरबार शहर,तळोदा व गुजरात राज्यातून मागील काही दिवसांमध्ये दुचाकी मोटार सायकल चोरी करून आणलेल्या होत्या,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध कंपनीच्या 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 8 महागड्या मोटार सायकली कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकलींबाबत माहिती घेतली खालीलप्रमाणे 25 हजार रु.कि.ची काळया रंगाची स्पलेंडर मोटर सायकल क्रमांक MH-39-S- 2702 चोरीबाबत उपनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379, 20 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल चोरी बाबत तळोदा पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 379, 45 हजाररु. कि.ची काळया रंगाची बजाज पल्सर 125 सीसी डीटीएस मॉडेलची GJ-26-AC 7734 चोरीबाबत गुजरात राज्यातील व्यारा पोलीस ठाण्यात, 75 हजार रु.कि.ची यामाहा R15 कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल क्रमांक GJ-16-CR-3135, 50 हजार रु.किं.ची काळ्या रंगाची होंडा कंपनीची युनिकॉन मांडेलची रंगाची मोटर सायकल GJ 16-BF -3858, 50 हजार रु. किं.ची काळया रंगाची होडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची मोटर सायकल जीचा दिसता क्रमांक GJ-21-N-9231, 40 हजार रु.कि. राखाडी रंगाची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटर सायकल क्रमांक GJ-22-F-9454, 30 हजार रु.किं.ची हिरो होंडा कंपनीची स्पलेंडर प्लस मॉडेलची मोटर सायकल क्रमांक MH 39-E- 5048 असा एकूण 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 4 महागड्या मोटार सायकली कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.तसेच गुजरात राज्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे-उघडकिस करण्यात आलेले आहेत.तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी खोजल्या वण्या तडवी याच्याविरुध्द यापूर्वी 23 मालमत्तेविरुध्दचे गुन्हे नंदुरबार,धुळे,जळगांव व गुजरात राज्यात दाखल आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदुरबार पी आर.पाटील,प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहा.पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी,पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे,पोलीस नाईक सुनिल पाडवी,विशाल नागरे,बापू बागुल,रमेश साळुंखे,अभय राजपुत
यांच्या पथकाने केली आहे. नागरीकांना आवाहन करण्यात येते की,आप-आपल्या मोटर सायकली सुरक्षीततेच्या दृष्टीने फक्त सॅण्डल लॉकवर अवलंबून न रहाता त्यास लोखंडी साखळी कुलुपासह लावावीत.तसेच रात्रीच्या वेळेस आपली मोटर सायकल लॉक केल्यानंतर वाहनास कुठल्याही प्रकारचा स्पर्श झाल्यास किया हात लावल्यास सेन्सरद्वारे मोठ्याने आवाज होईल असे लॉक बाजारात अथवा ऑनलाईन सहज उपलब्ध होतात,म्हणून जास्तीत जास्त नागरीकांनी या लॉकचा वापर करावा करावा जेणे करून आपली मोटर सायकल सुरक्षीत राहील.तसेच काही संशयास्पद इसम कागदपत्र नसलेल्या मोटर सायकली विकत असतील त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष,नंदुरबार 02564-210100/- 210113स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार 02564210107यावर संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी केले आहे.








