नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 1 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय,नविन पोलिस कवायत मैदान,स्व.राजीव गांधी मार्ग (टोकर तलाव रोड ) नंदुरबार येथे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे.
या ध्वजारोहणाचा कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांच्या वीर पत्नी व त्यांचे आई- वडील, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था, शासकीय, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) नितीन सदगीर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.








