शहादा l प्रतिनिधी
खेडदिगर शहादा रस्त्यावरील सुसरी डॅमसमोरिल पुलाच्या खाली खोल नदी पात्रात दुपारच्या रणरणत्या उन्हात नदीपात्रातील खडकाळ भागातून पळत जाऊन शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज खेडदिगरहुन शहादाकडे शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी येत असताना सुसरी डॅमसमोरिल पुलावरून खाली खोल नदी पात्रात त्यांना ट्रॅक्टर दृष्टीस पडले.त्यावेळी शासकीय गाडीने खाली उतरल्यास सदर वाहन पळुन जायची शक्यता असल्याने तहसीलदारांनी गाडी बाजुला ठेवुन स्वत: जैन लेण्यांच्या बाजुने नदीपात्रात उतरले.ट्रॅक्टरच्या आसपास पाच-सहा लोकं असल्यामुळे त्यांना कुणी येत आहे असा संशय येऊ नये याकरिता डोक्यालात्यांनी रूमाल बांधला व त्याचबरोबर हावभावातही बदल करुन सहज येत असल्याचे भासवले मात्र कोणी येत असल्याचा अंदाज आल्याने अचानक ट्रॅक्टर निघाले व नदीच्या खडका खडकातुन वर यायला लागले.त्याक्षणी प्रसंगास साजेसे अवधान राखत तहसीलदार पळु लागलो..ट्रॅक्टरने आणखीनच वेग घेतला.नदीपात्रातल्या खडका खडकातुन, सखल-उंचवट्यातुन दुपारच्या रणरणत्या उन्हात पळत जाऊन शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी
हे नदीपात्रातल्या शर्यतीत जिंकले.त्यांनी पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे वाहन जमा केले.यावेळी शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनीही तातडीने पथक मदतीकरिता पाठवुन या कारवाईस मदत केली.यावेळी अ.का. प्रदीप पाटील उपस्थित होते.








