नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथे ” महिला विषयी कायदे : यांचा वापर किंवा गैरवापर” Women Related Laws: It’s use or misuse.” या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी.चौधरी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले व अध्यक्षीय मनोगतात प्रतिपादन केले की, आज आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर महिलांसाठी अनेक कायदे करण्यात आलेले आहे पण आजची परस्थिती जर आपण पाहिली तर असं लक्षात येते की, या कायद्यांचा वापर कमी होत आहे. आणि गैर वापर जास्त प्रमाणात होत आहे. महिला विषयी कायदे म्हणजे दुधारी तलवार आहे. यांचा जर योग्यरीत्या वापर केला तर समाजाची व देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही पण जर या कायद्यांचा गैरवापर केला तर समाजात आणि देशात याचा विषम परिणाम होईल
सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा. डॉ.आशा आर. तिवारी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी महिलांसाठी विशेष कायदे करण्यामागील उद्दिष्टे व आजची परिस्थिती काय आहे हे स्पष्ट केले .चर्चासत्रात महाविद्यालयाच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला. यात योगेश महाजन ,दानिश खाटीक, सृष्टी सोनार, शिवानी सोनार, बिंदिया ब्राह्मणे, किरण निकम ,मानसी धारूप, विनीत बडगुजर व गौतम ईशी यांनी महिला विषयी कायदे यांचा भविष्यात समाजावर व देशावर होणारा सकारात्मक व नकारात्मक परिणाम याबद्दल आपली मते मांडली. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. आशा आर. तिवारी यांनी केले
चर्चासत्र आयोजनासाठी भारताचे माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल मा. ॲड. राजेंद्र रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष मा. आ.चंद्रकांत रघुवंशी उपाध्यक्ष मनोज रघुवंशी तसेच सर्व संचालक मंडळाने प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी कार्यक्रम भविष्यात राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली . आभार प्रदर्शन विद्यार्थिनी देवयानी शेवाळे यांनी केले.








