Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कन्यादान या हिंदु धर्म परंपरेची खिल्ली उडविणाऱ्या आ. अमोल मिटकरीवर नंदुरबार पोलीस दाखल झाली तक्रार

team by team
April 25, 2022
in राजकीय
0
कन्यादान या हिंदु धर्म परंपरेची खिल्ली उडविणाऱ्या आ. अमोल मिटकरीवर नंदुरबार पोलीस दाखल झाली तक्रार

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी याने सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिसंवाद मेळाव्यात भाषण करतांना हिंदु धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या मारुती स्तोत्राची चेष्टा केली तसेच हिंदु धर्मातील विवाह संस्कारातील पवित्र कन्यादान विधीबद्दल जाणून बुजून केलेले वक्तव्य बेताल, खोटे असून मिटकरींनी हिंदूधर्म परंपरेची खिल्ली उडविली म्हणून आ. अमोल मिटकरी याच्यावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र परशराम पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन अमोल मिटकरीवर भादवि कलम १५३(अ), २९५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, हिंदू धर्मात विवाह संस्कारातील कन्यादान विधी अत्यंत पवित्र कार्य असून त्या विधीद्वारे दोन परिवारात आणि वधू-वर यांच्यात पवित्र संबंध निर्माण होतात तसेच कन्यादान केल्यानंतर मुलीला संसारात सौभाग्य प्राप्त होते कन्यादान विधीमध्ये ‘मम भार्या समर्पयामि’ असा कुठलाही मंत्र नाही अथवा विवाहात असा मंत्र उच्चार केला जात नाही असे माहिती असतांना ही हिंदू धर्म आणि संस्कृती मधील कोणत्याही धार्मिक विधी बद्दल कुठलीही शास्त्रोक्त माहिती नसतांना अमोल मिटकरी यांनी जाणून बुजून हिंदूंचा धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने हे वक्तव्य केले आहे तसेच मारुती स्तोत्राची चेष्टा करून रामभक्त हनुमान बद्दल असलेल्या श्रद्धेचा जाणून बुजून अपमान केलेला आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने आ. अमोल मिटकरी याचे विरुद्ध हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी दखलपात्र गुन्ह्याची कायदेशीर फिर्याद २४ एप्रिल रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.

बातमी शेअर करा
Previous Post

विखरण विकासो चुरशीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या दणदणीत विजय

Next Post

अनेक राज्य भारनियमनाने होरपळत असतांना महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात, महावितरणचे यशस्वी नियोजन

Next Post
राज्यात लोडशेडींगचे संकट टळणार, वीज खरेदी करण्यास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अनेक राज्य भारनियमनाने होरपळत असतांना महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात, महावितरणचे यशस्वी नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add