म्हसावद l प्रतिनिधी
शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी व खेडदिगर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कु.वंदनाताई पटले यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद बांधकाम विभाग नंदुरबार अंतर्गत जाम ते मेलन ६५० मीटर डांबरीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच ईश्वर वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
सदर जाम ते मेलन रस्त्या खुप खराब झाला असल्याने जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई पटले यांनी जाम ग्रामस्थांच्या मागणी नुसार रस्त्याचे काम काही काळातच मार्गी लावल्याबद्दल ग्रामपंचायत जाम ग्रामस्थ वतीने त्यांचे आभार व्यक्त करीत आहे.
यावेळी सरपंच ईश्वर वाघ,ग्रामसेवक नारायण पवार,सदस्य लखन चव्हाण, अनिल चव्हाण,सदस्या पूणम चव्हाण,निवंती शेमळे,सुभाष वाघ नवल चव्हाण,आखिराज पवार,प्रशांत पवार,मच्छिंद्र चव्हाण,लक्ष्मण चव्हाण, नितिन चव्हाण आदि ग्रामस्थ उपस्थित होते.










