म्हसावद l प्रतिनिधी
– महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (सिव्हिल) ग्रेड – ब, ग्रेड -II, वॉटर रिसॉर्सेस डिपार्टमेंट परीक्षेत शहादा येथील रहिवासी पाटील राहुल भगवान यांची असीस्टंट इंजिनीअर या पदावर नियुक्ती झाली असुन त्यांना सदर परीक्षेत एकुण :- 303 मार्क मिळाले असुन AWB – OPEN – जनरल रँक मधून 37 क्रमांक आला आहे. राहुल हा शहादा महसूल मंडळ अधिकारी बी.ओ.पाटील यांचा मुलगा आहे.
त्यांच्या यशाबद्दल शहादा उपविभागीय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी राहुल पाटील यशा बदल त्यांचं अभिनंदन केले. सर्व शहादा महसूल कर्मचारी वृंद तसेच मित्रमंडळी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत राहुल पाटील यांचे या पदावर निवड झाली बाबतीत अभिनंदन केले जाते आहे.










