तळोदा l प्रतिनिधी
गोपाळपूर ता तळोदा येथे जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नवीन सुरू असलेल्या सामाजिक सभागृह बांधकामाची पाहणी करण्यात आले. गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन लवकरच पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी ,ग्रा.प. प्रशासक बी.के.पाटील, ग्रामसेवक मुकेश कापुरे,पाडळपुर सरपंच देवीलाल ठाकरे,ग्रा. प.सदस्य जंगलसिंग पाडवी, जहागीर ठाकरे,शालेय समितीचे सदस्य सुरेश मोरे, शिक्षिका संगिता जाधव , जयेश नाईक,विजय ठाकरे, देवीसिंग वळवी, चुनीलाल पाडवी,मोकना पाडवी, कालुसिंग पाडवी, कांतीलाल पाडवी, शामा वसावे, अंगणवाडी वासंतीबाई जांबोरे, मदतनीस अरूणाबाई ठाकरे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.