नंदूरबार l प्रतिनिधी
लायन्स क्लब फेमिनाचे सेवा वर्ष जुलै २०२१ मध्ये सुरू झाले. कोरोनाचे संकट समोर असताना याच काळात लायन्स फेमिना क्लबने जेथे कमी तेथे आम्ही या भूमिकेतून मोठ्या प्रमाणावर सेवा कार्य केले.लायन्स परिवारात डिस्ट्रिक्ट काँफेरन्सच्या माध्यमातून प्रत्येक क्लबच्या सेवा कार्याचा आढावा घेण्यात येतो व पुरस्कार देण्यात येतात. यंदा ही काँफेरन्स सेलवास येथे घेण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरील लायन्स पदाधिकारी प्रांतपाल विवेक अभ्यंकर, उपप्रांतपाल दिलीप मोदी ,आदी मान्यवर उपस्थित होते.यात लायन्स क्लब फेमिनाला सिल्व्हर अवॉर्ड फॉर बेस्ट लायन व्हिजन,बेस्ट लायन्स क्लब न्यू व्हॉइसेस, बेस्ट बॅनर प्रेझेंटेशन,१५ नवे सदस्य जोडल्या बद्दल सिल्वर कॉइन, लायन्स इंटरनॅशनल चे बेस्ट वर्क फॉर न्यू व्हॉइसेस व बेस्ट स्पॉन्सर फॉर लायन्स न्यू व्हॉइसेस सर्टिफिकेट हे क्लब अवॉर्डस मिळाले तर क्लब अध्यक्ष हिना रघुवंशी यांना इंटरनॅशनल सर्टिफिकेट फॉर न्यू व्हॉइसेस सर्विस , क्लब सचिव सीमा मोडक यांना बेस्ट फर्स्ट व्ही पी अवॉर्ड , कॅबिनेट मेंबर सुप्रिया कोतवाल यांना नारी शक्ती का सन्मान कार्यासाठी सिल्वर अवॉर्ड व एम जे एफ डॉ. तेजल चौधरी यांना ८ मार्च या महिला दिनानिमित्त केलेल्या कार्यक्रमा बद्दल विशेष ऐप्रिसिएशन सर्टिफिकेट व गोल्ड मेडल फॉर बेस्ट डिस्ट्रिक्ट चेयेर पर्सन हे अवॉर्डस मिळालेत.क्लबला मिळालेले यश हे डिस्ट्रिक्ट, रिजन, झोन,चे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन, क्लब सदस्यांचे सहकार्य, परिवाराची भक्कम साथ या मुळेच मिळाले असल्याची भावना अध्यक्षा हिना रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे.कोरोना काळात, घर परिवार व समाजाची काळजी घेत या महिलांच्या क्लब ने केलेल्या समाजकार्यामुळे नंदुरबारचे नाव लायन्स वर्तुळात उंचावले गेले म्हणून समाजातून अभिनंदन होत आहे.








