नंदूरबार l प्रतिनिधी
श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.नंदूरबार येथे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, रामदास पिंपळे, दिपक पिंपळे, शरद पिंपळे त्यांच्यासोबत आलेले मित्रमंडळी, विद्यालयाच्या प्राचार्या सौ.विद्या चव्हाण ,पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर यांनी सूत्रसंचलन केले. सर्व प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.