नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने ज्युनियर मुले व मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी दि.18 एप्रिल 2022 रोेजी लोणखेडा येथे खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचणीत निवड झालेेल्या खेळाडूंचे संघ बीड येथे होणार्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र अॅमेच्युअर नेटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने ज्युनियर मुले व मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धा बीड येथे होणार आहे. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील मुले व मुलींचा संघ सहभागी होतील. त्यासाठी खेळाडूंची जन्म तारीख 1.4.2003 अशी असे आवश्यक आहे. जे खेळाडू वयात बसतील, अशा खेळाडूंनी सहभागी व्हावेे. राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने सोमवारी दि.18 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील साने गुरुजी महाविद्यालयाच्या मैदानावर निवड चाचणी होणार आहे. या निवड चाचणीसाठी उपस्थित राहणार्या खेळाडूंनी आधारकार्ड, दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट व जन्म दाखला आणणे आवश्यक आहे. चाचणी निवड झालेल्या ज्युनियर मुले व मुली असे दोन्ही संघ नंदुरबार जिल्ह्याचेे प्रतिनिधीत्व म्हणुन राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होतील. खेळाडूंच्या निवडी चाचणीकरीता नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी निरीक्षक म्हणुुन उपस्थित राहतील. म्हणुन सदर निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश परदेशी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी तथा कार्याध्यक्ष बळवंत निकुंभ, सचिव राजेंद्र भोई, खजिनदार प्रा.डॉ.अरविंद कांबळे यांनी केेलेे.