Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद; अभ्यासाच्या दिला सल्ला

team by team
April 13, 2022
in राजकीय
0
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद; अभ्यासाच्या दिला सल्ला

नंदुरबार l प्रतिनिधी
आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने कोणीही बाहेर खेळायला जाऊ नये. सायंकाळीच मनसोक्त खेळा. खेळा सोबत भरपूरच अभ्यास करून मोठं व्हा. आपल्या आई बाबांचा व मोठ्यांच्या आदर करा असा सल्ला शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
नंदुरबार शहरात अनेक शाळांच्या परीक्षा संपलेल्या आहेत.शाळांनाही लवकरच सुट्ट्या लागणार आहेत. मोठ्यांशी नेहमीच सुसंवाद होत असतो. परंतु,चिमुकलयांसोबत देखील संवाद व्हायला पाहिजे. या हेतूने माजी आ.रघुवंशी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी ‘आईस्क्रीम पे चर्चा’ केली. यावेळी ते म्हणाले, तासन तास मोबाईल वर व्हिडिओ गेम पाहू नका व्हिडिओ गेम पाहिल्यामुळे डोळे खराब होण्याची शक्यता असते. शालेय सुट्ट्यांच्या कालावधीत भरपूर अभ्यास करावा. अभ्यासासोबत विविध प्रकारचे खेळ खेळावेत. जेणेकरून आरोग्य सुदृढ राहील. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र,पुस्तकांचे वाचन करावे. कविता कराव्यात. थोर महापुरुषांच्या आत्मकथा वाचाव्यात. त्यांचे अक्षर बरोबर नाही त्यांनी शुद्धलेखनाच्या सराव करावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी पालिकेचे उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, नगरसेवक दीपक दिघे, पत्रकार हिरालाल चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी १ हजार विद्यार्थ्यांना आईसक्रीमचे वाटप करण्यात आले.
मस्ती केल्यानेच नापास झालो
विद्यार्थ्यांनी मस्ती न करता भरपूर अभ्यास करावा. आपल्याला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात करिअर करावे. एखादी कला अवगत करा त्या कलेकडे वळावं त्यामुळे सर्वांगीण विकास होईल.मी लहान असतांना खूप मस्ती करायचो. मस्तीत अभ्यास होत नव्हता. त्यामुळे एकदा नापास झाल्याच्या बालपणाच्या अनुभव माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थी संवादातून कथन केला.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

Next Post

नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीवर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यास मंजुरी

Next Post
नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीवर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यास मंजुरी

नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीवर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यास मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add