Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूकीबाबत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ शहादा, लोणखेडा व प्रकाशा कडकडीत बंद

team by team
April 11, 2022
in क्राईम
0
श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूकीबाबत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ शहादा, लोणखेडा व प्रकाशा कडकडीत बंद

नंदूरबार l प्रतिनिधी
शहाद्यात श्रीराम नवमी निमित्त रविवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पोलिसांनी बँड वाजविण्यास मज्जाव करून तो जप्त केला त्यामुळे भाविकांनी मिरवणूक स्थगित करीत ठिय्या आंदोलन केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ आज शहादा बंदचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनास शहादेकरांसह लोणखेडा व प्रकाशा येथेही उस्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.शहादा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजीक आंदोलनही करण्यात आले दरम्यान शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कोरोनाचे निर्बंध पूर्णतः उठविल्याने यंदा प्रशासनाने निवडणुकांना परवानगी दिली होती त्यामुळे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेची जय्यत तयारी करण्यात आल्याने प्रचंड उत्साह होता. या शोभायात्रेसाठी ढोल पथकासह बँड पथकही मागविण्यात आले होते. येथील चावडी चौकातून शोभायात्रेस सुरुवात होताच पोलिसांनी बँड वाजविण्यास मनाई करून बँड पथक ताब्यात घेतले त्यामुळे राम भक्तांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला बँड पथक येईपर्यंत मिरवणूक न काढण्याचा निर्णय निर्णय घेत रामा भक्तांनी जागेवरच ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने समझोता करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासनाला यश आले नाही. त्यातून वातावरणात कमालीचा तणाव निर्माण झाला पोलिसांच्या या भूमिकेवर रामभक्तांनी संताप व्यक्त करीत निषेध केला. पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ श्रीराम जन्मोत्सव समिती बजरंग दल बजरंग दल विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आज शहादा बंदचे आवाहन केले होते. या आवाहनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरातील संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने चहा विक्रेत्यांचा पासून ते भाजीपाला भाजीपाला मार्केट बंद होते.त्यामुळे शहरात सर्वच व्यवहार ठप्प झाले होते.शहरातील तणावाचे वातावरण पाहता पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बल, दंगा नियंत्रण पथक ,व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार शहरात तळ ठोकून आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे ,स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान या घटनेचा परिणाम तालुक्यात ही जाणवला तालुक्यातील लोणखेडा व प्रकाशा येथेही उस्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या आश्वासनानंतर तिनसमाळ ग्रामस्थांचे आमरण उपोषण दहाव्या दिवशी मागे

Next Post

भारतीय किसान सेना व भीलीस्थान लायन सेनेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व आदिवासी क्रांतिवीर खाज्या नाईक यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add