नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे झावळयांचा रविवार निमित्त ख्रिस्ती बांधवांतर्फे मिरवणूक काढण्यात आली.


होसान्ना होसान्ना प्रभुच्या नावाने येणारा राजा धन्यवादीत असो अशा घोषणा देत झावळयांचा रविवार निमित्त एस.ए.चर्च नंदुरबार येथे सर्व ख्रिस्ती बांधवांची मिरवणूक काढली.यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवानी ंहातात झावळया घेवन चर्च सभोवतालच्या परिसरात मिरवणुक काढली. त्यात रेव्ह जे जे.एस. पठारे, अनुप वळवी, सौ.नुतनवर्षा वळवी,पी.डी. लवणे, मार्था सुतार, डॉ.राजेश वसावे, हिवाळे, सत्यजीत नाईक, अंजय वळवी, राजेंद्र व्यास यांच्यासह खिस्ती बांधव मोठया उत्साहाने सहभागी झाले. होसाना याचा अर्थ प्रभु आमचा बचाव कर , तारण कर असा होतो. पुढे आठवडा भर इस्टर संडेपर्यंत रोज खिस्त, बांधवांच्या प्रार्थना सभा चर्चमध्ये होणार आहे.









