Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन तत्पर : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

team by team
April 10, 2022
in राजकीय
0
दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन तत्पर : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

म्हसावद l प्रतिनिधी
जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसह समाजातील सर्व नागरिकांना दर्जेदार आरोग्यांच्या सुविधा उपलब्ध करण्यास शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले.


राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत मोलगी येथे आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हीनाताई गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक, कृषि व पशुसवंर्धन सभापती गणेश पराडके, जि.प.सदस्य बाजुबाई किरसिंग वसावे, हिराबाई पाडवी, सी.के. पाडवी, निलूबाई पाडवी, अक्कलकुवा पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, उपसभापती विजय पाडवी, माजी सभापती पिरेसिंग पाडवी, दिलीप नाईक,मोलगीचे सरपंच मनोज तडवी, उपसरपंच कृष्णा वसावे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, डॉ.राजेश वसावे आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड.पाडवी म्हणाले, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या आरोग्यांची काळजी घेण्यासाठी शासन तत्पर असून कोणत्याही रुग्णास उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नये, त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता शासनामार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर तेथेच औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणाऱ्या रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असल्यामुळे या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. नागरिकांनी सिकलसेल,मधुमेह, उच्चरक्तदाबाची नियमित तपासणी करावी. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त निधी आरोग्य विभागाला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाज वर्षानुवर्षे शेवगा, चिंचेचा पाला व अन्य वनस्पतींचा पाला, फुले व फळे यांचा भाज्या म्हणून आहारात वापर करीत आहे. या भाज्या असल्या तरी त्या मुळात वनौषधी आहे, त्यामुळे अनेक आजारांवर त्या उपायकारक आहे. म्हणून आदिवासी बांधवांनी या रानभाज्यांशी जुळलेली नाळ न तुटू देता त्यांचा परंपरेनुसार आहारात नेहमीच वापर करावा, असे आवाहनही ॲड.पाडवी यांनी केले. या शिवाय आदिवासी बांधवांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये असे आवाहन करीत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ.गावीत म्हणाल्या की, प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आजाराची तपासणी ही केलीच पाहीजे. यामुळे आपल्याला कोणता आजार आहे त्वरीत समजते. याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबीराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. गरोदर मातानी आपले नाव प्रामथिक आरोग्य केंद्रात नाव नोंदवले असता त्यांना शासनाकडुन 5 हजार रुपये मिळतात. त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. प्रत्येक रुग्णानी अशा सर्व रोगनिदान शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन खासदार डॉ.गावीत यांनी यावेळी केले. या शिबीरास मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पातोंडा शिवारात कुटूंबिय घरात झोपलेले असतांना धाडसी चोरी

Next Post

आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन 18 वर्षीय युवतीची आत्महत्या

Next Post
आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास  घेऊन 18 वर्षीय युवतीची आत्महत्या

आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन 18 वर्षीय युवतीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add