नंदुरबार । शहरातील
राणी लक्ष्मीबाई सांस्कृतिक मंडळातर्फे श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला
नंदुरबार येथील राणी लक्ष्मीबाई सांस्कृतिक मंडळातर्फे श्री राम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अभिजीत मोरे, प्रथमेश शिरीष चौधरी, प्रशांत कन्हैयालाल चौधरी, राज ईश्वर चौधरी, मयूर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिमा भेट देऊन उपस्थितांचा मंडळाचे अध्यक्ष मयूर चौधरी यांनी सन्मान केला . या धार्मिक कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष मयूर चौधरी, राज सोनार,दर्शन चव्हाण, करण वाघ,हितेश हिरे,रोहन सोनार,सुयोग सूर्यवंशी, दीप जगताप,कुणाल परदेशी, अमोल ठाकरे,सागर वरसाळे, मनीष चौधरी, जयेश चौधरी, केतन चौधरी, संतोष लोहार यांनी परिश्रम घेतले. लक्ष्मीबाई सांस्कृतिक मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.










